राहुल गांधीची कार्यकर्त्यांना सक्तीची ताकीद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेसचे जेष्ठ नेते सी. पी. जोशी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चागलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात आता खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही भाग घेतला असून ‘सी. पी. जोशी यांचे विधान काँग्रेस पक्षाच्या आदर्शाविरोधात आहे’ असे मत नोंदवले आहे. तसेच ‘पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करू नये’ अशी सक्तीची ताकीद राहूल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

सी. पी जोशी यांनी नाथदवार येथे प्रचारसभेत
नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘धर्माबद्दल फक्त ब्राह्मणांना माहीत असते’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानावर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तसेच ‘सी. पी. जोशी यांनी राजकारणात खालची पातळी गाठली’ असे टोमने ही जाशी यांना राजकिय वर्तुळात मारले जात आहेत.

अखेर राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरद्वारे सी. पी . जोशी याच्या वक्तव्याची दखल घेत ‘जोशी यांचे विधान काँग्रेसच्या विरोधात आहे’ असे म्हटले आहे. नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही विधान करू नये तसेच काँग्रेस पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून जोशी यांना त्यांची चूक लक्षात येईल’ असे मत राहुल यांनी ट्विट द्वारा मांडले आहे.

 

 

Leave a Comment