चौकीदार चोर है ! या विधानावर राहुल गांधींचा माफीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । आज सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अवमान प्रकरणात कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच न्यायालयाने राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यासह शबरीमाला मंदिराचा निकाल देणाऱ्या कोर्टाने तो एका मोठ्या खंडपीठाकडे सुपूर्द केला आहे.

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील ‘चौकीदार चोर है’ या टिप्पणीला नकार देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरूद्ध अवमान याचिका फेटाळली. कोर्टाने म्हटले आहे की गांधींनी केलेले वक्तव्य सत्यतेपासून दूर होते. आणि त्यांनी अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या पाहिजेत आणि सावधगिरी बाळगायला हवी होती.

राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील खंडपीठाने राफेल प्रकरणातील सर्व पुनर्विचार याचिका फेटाळल्या आहेत. राफेल खरेदी व्यवहारात घोटाळ्याचे आरोप कोर्टाने फेटाळून लावले. फ्रान्सकडून ३६ राफेल विमान खरेदीप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका कोर्टाने पुन्हा फेटाळून लावल्या आहेत.

Leave a Comment