घोटाळा, दहशतवादी हल्ले, जलसंकट.. राहुल गांधींनी NDA च्या पहिल्या 15 दिवसांचा पाढाच वाचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा एकदा NDA सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन १५ दिवस होत नाहीत तोच देशात अनेक वेगवगेळ्या घटना घडल्या. पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे अपघात झाला, NEET परीक्षा घोटाळा प्रकरण ताजे आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले. या सर्व घटनांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींवर आणि NDA सरकारवर निशाणा साधला. NDA सरकारच्या पहिल्या १५ दिवसात नेमक्या कोणकोणत्या घटना घडल्या याचा पाढाच राहुल गांधी यांनी वाचला. राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

NDA चे पहिले १५ दिवस!

  1. भीषण रेल्वे अपघात
  2. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले
  3. गाड्यांमधील प्रवाशांची दुर्दशा
  4. NEET घोटाळा
  5. NEET PG रद्द
  6. UGC NET चा पेपर लीक झाला
  7. दूध, डाळी, गॅस, टोल आणि महाग
  8. आगीने जळणारे जंगल
  9. जलसंकट
  10. उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू

मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर आहेत आणि आपले सरकार वाचवण्यात व्यस्त आहेत. नरेंद्र मोदी जी आणि त्यांच्या सरकारचा संविधानावर झालेला हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. भारताचा प्रबळ विरोधक आपला दबाव कायम ठेवेल, जनतेचा आवाज उठवेल आणि पंतप्रधानांना जबाबदारीशिवाय सोडणार नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

दरम्यान, आज १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली. मात्र पंतप्रधान मोदी शपथ घेण्यासाठी जात असतानाच राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी हात वर केला. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधकांनाही यावेळी हात वर केले होते. राहुल गांधींच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा संविधानावर जो हल्ला करत आहेत, तो आम्हाला मान्य नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही, त्यामुळेच आम्ही संविधानाची प्रत हातात घेतली होती असं राहुल गांधी यांनी म्हंटल.