राहुल गांधीच्या ट्विटने देशभरात खळबळ!! म्हणाले, आतल्या गोटातून समजतंय की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. मी संसदेत चक्रव्यूहावर केलेलं भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही, आणि त्यामुळे आपल्यावर ईडी कारवाई करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटल. तसेच मी यासाठी तयार सुद्धा असेही असेही त्यांनी सांगितलं. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तसेच खरच राहुल गांधी यांच्यावर ईडीची कारवाई होणार का? ते आता पाहायला हवं.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत जोरदार भाषण करत मोदी शहांसह संपूर्ण भाजपवर हल्लाबोल केला होता. २१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून कमळाच्या आकाराचे आहे. त्याचं चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून चालतात. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता देशातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक हे त्या चक्रव्यूहात अडकले आहेत. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यानंतरच आता आपल्यावर ईडीची कारवाई होणार आहे अस राहुल गांधी यांनी सांगितलं.

राहुल गांधींनी ट्विट करत म्हंटल, दोघांपैकी एकाला माझे चक्रव्यूहचे भाषण आवडले नाही. ईडीमधील आतील गटाने मला सांगितले की, तुमच्यावर छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे. ईडीची वाट पाहत आहे. चहा आणि बिस्कीटे माझ्याकडून.. राहुल गांधी यांच्यावर खरोखरच ईडीची कारवाई होणार का? नेमक्या कोणत्या प्रकरणात हि कारवाई होईल यावरून चर्चाना उधाण आलं आहे.