राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. यावर भाजपने आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी तेव्हाच ते ट्विट ट्विटर वरून हटवल होत. परंतु ट्विटर ने तरीही त्यांचे अकाउंट तात्पुरत बंद केलं.

राहुल गांधी यांनी नागर येथील पीडित मुलीचे फोटोचे ट्विट केल्यानंतर विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल यांनी केलेलं कृत्य हे पोक्सो कायद्यांतर्गत येतं. तसेच भादंविच्या कलम 228अच्या कलम 23 अंतर्गत हा गुन्हा आहे, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती.

दरम्यान राहुल गांधी यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्वीट करत म्हंटल की, “राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील.. . जय हिंद.”