हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसने मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. पक्षाने राहुल गांधी याना अमेठी मधून नव्हे तर रायबरेलीतून लोकसभेचे (Raebareli Lok Sabha) तिकीट दिले आहे. म्हणजेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढतील. तर दुसरीकडे अमेठी मधून गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे केएल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.
आज अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. 2014 मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी मधून विजय मिळवला होता, परंतु 2019 मध्ये स्मृती इराणींनी त्यांचा पराभव करत नवा इतिहास रचला होता. आता राहुल गांधींनी थेट मतदारसंघच बदलला आणि रायबरेलीतून निडवणूक लढवण्याचा निर्णय घेतला. रायबरेलीशिवाय राहुल गांधी वायनाडमधूनही निवडणूक लढवत आहेत.
'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए श्री @RahulGandhi को उत्तर प्रदेश के रायबरेली से और श्री किशोरी लाल शर्मा को अमेठी से कांग्रेस उम्मीदवार घोषित किया गया है। pic.twitter.com/AyFIxI62XH
— Congress (@INCIndia) May 3, 2024
रायबरेली हा गांधी घराण्याचा जिव्हाळ्याचा लोकसभा मतदारसंघ आहे. 2004 ते 2019 या काळात सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार होत्या. खासदार असताना त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. याशिवाय त्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षाही होत्या. सध्या सोनिया गांधींची निवड राज्यसभेवर झाली असल्याने त्या लोकसभा लढवणार नाहीत. दुसरीकडे, प्रियांका गांधी वड्रा यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर, राहुल यांना सोनिया गांधी यांचा राजकीय वारसा हाती घेण्यासाठी रायबरेलीतून पुढे करण्यात आले असल्याचे बोललं जात आहे .