हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातून लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Elections Result) समोर येऊ लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. हा विजय त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल गांधींनी भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांचा सुमारे तीन लाख 90 हजार मतांनी पराभव केला आहे. तर वाराणासीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अजय राय यांना पराभव केला आहे.
खरे तर, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यावर केवळ वायनाडची जागा वाचवण्याची जबाबदारी नव्हती, तर रायबरेलीला सुरक्षित ठेवण्याचेही मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. कारण की, 2019 मध्ये अमेठीमधून पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला होता. त्यानंतर जनतेचा पुन्हा विश्वास जिंकण्याची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर होती. हीच जबाबदारी राहुल गांधी यांनी व्यवस्थित पार पाडली असल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसून आले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मिळवला आहे. मोदी यांनी अवघ्या दीड लाख मतांनी काँग्रेसचे अजय राय यांचा पराभव केला आहे. तर, रायबरेली येथून राहुल गांधी विजयी झाले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले आहे. या निकालातून स्पष्ट होईल की, देशात इंडिया आघाडीने सरकार येईल की पुन्हा पंतप्रधान मोदी सत्ता गाजवतील.