राहुल गांधींकडून शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने!! शेतमालाला योग्य हमीभाव ते कर्जमाफी… सगळं काही मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यापासून विविध पक्षा जनतेला मोठमोठी आश्वासने देत आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही रायबरेलीमधील (Raebareli) सभेत बोलताना शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली आहे. या आश्वासनांमध्ये “येत्या 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल” असे राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी म्हटले आहे. तसेच, “इंडिया आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देईल” असा विश्वासही राहुल गांधींनी जनतेला दिला आहे.

रायबरेलीच्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी म्हणले की, “इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊ. यासह आम्ही पुन्हा मनरेगा व्यवस्थित सुरू करु. तुम्हाला मनरेगासाठी 250 रुपये नाही तर 400 रुपये मिळतील. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जे माफ केलेली नाहीत, आम्ही अमेठीतील सर्व गरीब शेतकऱ्यांची कर्जे माफ करुन दाखवू. मी अमेठीचा होतो, मी अमेठीचा आहे आणि राहणार”

त्याचबरोबर, “आम्ही अमेठीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या आशा आणि अंगणवाडी महिलांचे उत्पन्न दुप्पट करू. आज तुम्हाला जे काही मिळत आहे त्याच्या दुप्पट चार जून नंतर मिळेल. सध्या उत्तर प्रदेशमध्ये शेतमालाला योग्य दर मिळत नाही. शेतकऱ्यांच्या तांदळाला, ऊसाला, बटाट्याला योग्य भाव दिला जात नाही. परंतु 4 जूननंतर सर्व शेतकऱ्यांना कायदेशीर किमान आधारभूत किंमत दिली जाईल.” असे राहूल गांधी यांनी म्हणले.

दरम्यान, “ही लोकसभा निवडणूक सार्वत्रिक निवडणूक नाही. ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे. पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलू, असे भाजपच्या लोकांनी उघडपणे सांगितले आहे. संविधान संपले तर आरक्षण संपेल. सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या संपतील. या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.” असे राहुल गांधी यांनी म्हटले.