कराड | घारेवाडी (ता. कराड) येथील शिवमं प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी महेश मोहिते, सचीवपदी प्रताप भोसले तर खजीनदारपदी प्रताप कुंभार यांची निवड झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी ही कार्यकारणी जाहीर केली.
शिवम्ं प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉ. शंतनु कुलकर्णी, अरविंद कलबुर्गी, संजय पाटील, संभाजी देवकर, डॉ. प्रकाश शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. नवी कार्यकारणी इंद्रजीत देशमुख यांनी जाहीर केली. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचीव, खजीनदार यांच्यासह विश्वनाथ खोत, डॉ. अशोक सावंत, यतीन सावंत, देवेंद्र पिसाळ, धनंजय पवार, सलीम मुल्ला, भगवान नलवडे, डॉ. सुशांत मोहिते, सुहास पाटील, विजयालक्ष्मी शेट्टी, सुनिता गरुड यांचा समावेश आहे.
यावेळी नुतन विश्वस्तांचा सत्कार माजी विश्वस्तांच्या हस्ते झाला. निवडीनंतर श्री. देशमुख यांनी शिवम्ं प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सुरु असलेल्याय कार्यामध्ये सर्वांचेच मोठे योगदान आहे. शेती, आरोग्य, शिक्षण या विषयावर प्रतिष्ठान यापुढे काम करेल. नाम फाऊंडेशनच्या मदतीनेही प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबवले जात आहे. प्रतिष्ठानच्या कार्याला समाजातील सर्वाची साथ मिळावी, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.