‘जमात ए इस्लाम’ च्या शाखांवर  या कारणामुळे छापे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर वृत्तसंस्था | ‘जमात ए इस्लाम’ च्या शाखांवर  छापे घालण्यात आले आहेत. ‘जमात ए इस्लाम’ च्या ८० सदस्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांचे बॅंक खाते सील करण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने जम्मू कश्मीर मधील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिले असून काश्मीरमधील प्रत्येक जिल्ह्यात अटकसत्र सुरु करण्यात आले आहे.

‘जमात ए इस्लाम’ या संघटनेच्या विरुद्ध मुलांना शिक्षण देऊन देशाविरोधात भडकविण्याचे पुरावे सापडले आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहेत. त्यामुळे काश्मीर मधील फुटीरतावाद्यांचे कंबरडे मोडणार आहे.

पीडीपीचे नेते वाहिद पारा आणि आयएएस ऑफिसर शाह फैजल यांच्यासह इतर १५५ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ही कारवाई करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरमधील १८ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा प्रशासनाकडून हटवण्यात आली होती.

 

इतर महत्वाचे –

अभिनंदनचं भारतात आगमन…

जळगावचा सिंघम आता अहमदनगरमध्ये

चंद्रपुरात वृद्ध शेतकऱ्याचा खून

Leave a Comment