रेल्वेने लाँच केलं RailOne App; तिकीट बुकिंगपासून ते जेवणापर्यंत सर्व काही मिळणार

RailOne App
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन RailOne App । भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांच्या सुखसोयीसाठी नवीन अँप लाँच केलं आहे. RailOne App असं या अँपचे नाव असून रेल्वेच्या सर्व सार्वजनिक सेवा तुम्हाला या अँपच्या माध्यमातून मिळतील. अगदी तिकीट बुकिंग करण्यापासुन ते , पीएनआर स्टेटस चेक, कोच पोझिशन माहिती, तिकीट रिफंड आणि ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करणे यासारख्या अनेक गोष्टी या अँप मध्ये उपलब्ध आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस असे दोन्ही यूजर्स हे अँप वापरू शकतात. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर दोन्हीवर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. RailOne भारतातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी मोठा आधार बनेल असं बोललं जात आहे.

कोणकोणत्या सुविधा मिळतात? – RailOne App

रेलवन अॅपमध्ये बहुभाषिक सपोर्ट देण्यात आला आहे, म्हणजेच तुम्ही हव्या त्या भाषेत हे अँप वापरू शकतात. RailOne अँपचा महत्वाचा फायदा म्हणजे आता बुकिंग, फूड ऑर्डर किंवा फीडबॅकसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरण्याऐवजी, प्रवासी आता एकाच अॅपद्वारे सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात. अँप मधील Plan My Journey टूलद्वारे आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही तिकिटांसाठी बुकिंग करता येईल. ज्यामध्ये विविध प्रवास वर्ग आणि कोटा समाविष्ट आहेत. तसेच RailOne अॅप वरून लाइव्ह ट्रेन ट्रॅकिंग करता येऊ शकते. ट्रेन आत्ता कुठे आहे? तिचा प्लॅटफॉर्म क्रमांक किती आहे? तर रेल्वेला उशीर झाला असेल तर का झाला याचे लाईव्ह अपडेट्स या अँप मधून पाहता येतील. यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. प्रवासी रेलवन अॅपद्वारे रेल मदत सेवा देखील मिळवू शकतात. याद्वारे, प्रवासी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात

RailOne मध्ये भारतीय रेल्वेची अधिकृत डिजिटल वॉलेट प्रणाली R-Wallet चा समावेश आहे. बायोमेट्रिक किंवा mPIN टाकून तुम्ही याद्वारे व्यवहार करू शकता. जर कोणत्याही कारणास्तव प्रवास रद्द झाला किंवा चुकला तर, प्रवासी थेट रेलवन अॅपवरून रिफंड साठी विनंती सुद्धा करू शकतात. प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये अन्न ऑर्डर करण्याची सुविधा रेलवन अॅपद्वारे देखील उपलब्ध आहे. प्रवासी अॅपद्वारे पार्टनर वेंडर्स कडून त्यांचे आवडते जेवण बुक करू शकतात.