हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पश्चिम बंगालमधील कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेमध्ये तब्बल दहा जणांनी आपला जीव गमावल्यानंतर भारतीय रेल्वे बोर्डने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात रेल्वे बोर्डाने (Raiway Board) सहाय्यक लोकोपायलट (Train Driver) साठी 13000 हून अधिक नवीन जागा भरण्यासाठी आदेश जारी केला आहे. जारी केलेल्या सूचनांनुसार, सहाय्यक लोकोपायलट (ALP) च्या 18,799 रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. यामुळे तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
जानेवारी महिन्यामध्ये याच पदासाठी 5696 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र आता रेल्वे बोर्ड 5696 पेक्षा अधिक जागा भरणार आहे. महत्वाचे म्हणजे, रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात चालक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे ओव्हर ड्युटी करणाऱ्या चालकांवरील ताण कमी होईल आणि चालकांमुळे होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणातही घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोमवारी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. या अपघातात
मालगाडीच्या चालकाने थेट कांचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे रेल्वेचेही मोठे नुकसान झाले आणि अनेक प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच भारतीय रेल्वे बोर्डाने सहाय्यक लोकोपायलटच्या (ALP) 18,799 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.