Railway Destination Alert : उठा उठा तुमचं स्टेशन आलं; रेल्वे स्वतःच प्रवाशांना देते अलर्ट, तुम्हाला माहितेय का ही सुविधा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे सर्वात उत्तम साधन मानलं जाते. रेल्वेचा प्रवास कमी पैशात होत असल्याने आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं असल्याने लांबच्या प्रवासासाठी रेल्वे चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. तुम्हालाही रेल्वे प्रवास आवडत असेल. मात्र रेल्वे आपल्या प्रवाशांना देत असलेल्या सोयी सुविधेबद्दल सर्वानाच माहिती असेल असं नाही. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या डेस्टिनेशन अलर्ट (Railway Destination Alert) सुविधेबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बिन्दास्त पणे ट्रेनमध्ये झोपू शकता आणि रेल्वे स्वतःच तुम्हाला तुमचं स्टेशन आलं कि उठवेल.

जेव्हा आपण रायेंट्रीच्या वेळी प्रवास करतो त्यावेळी आपलं स्टेशन चुकण्याची भीती नेहमीच असते. पण, जर तुम्ही रेल्वेच्या डेस्टिनेशन अलर्ट सुविधेचा लाभ घेतला तर तुम्ही शांतपणे झोपू शकता. या सुविधेत, तुमची रेल्वे हि सदर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच तुमच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज (Railway Destination Alert) पाठवून तुम्हाला जागे करते जेणेकरून तुम्ही तुमचे स्टेशन चुकवू नये. रेल्वेच्या या सेवेची निवड करणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आगोदरचे मोबाईल नंबर वर वेक-अप कॉल किंवा एसएमएस मिळेल. खास बाब म्हणजे यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता सुद्धा नाही. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत लांबच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच ही सुविधा देण्यात आली आहे.

रेल्वेच्या डेस्टिनेशन अलर्ट सेवेचा लाभ कसा घ्याल- Railway Destination Alert

यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला IRCTC हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करावा लागेल.
याठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीची भाषा निवडावी लागेल.
ज्याठिकाणी तुम्हाला उतरायचे आहे त्या ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला 7 नंबर आणि नंतर 2 नंबर दाबावा लागेल.
यानंतर तुम्हाला 10 अंकी PNR क्रमांक विचारला जाईल. तो तुम्हाला १ नंबर दाबून कन्फर्म करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही वेक अप अलार्म सेट करू शकाल.
या सेवेसाठी तुम्हाला फक्त 3 रुपये द्यावे लागतील.