मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे विकास समितीचे आंदोलन

औरंगाबाद | मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या 25 वर्षांपासून मराठवाड्यातील रेल्वे संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

प्रामुख्याने परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावा. तसेच मुदखेड ते मनमाड विधुतिकारणासह दुहेरी लाईनचे काम पूर्ण करावे यासह विविध मागण्यांसाठी आज सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सामितीच्या वतीने मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा सह इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

या आहेत मागण्या प्रमुख मागण्या :

– रोटेगाव ते कोपरगाव हा 22 किमीचे काम डीपीआरच्या भोवर्‍यात अडकले आहे त्या कामास चालना देऊन 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावे.
– औरंगाबाद चाळीसगाव 88 किमीच्या कामास मंजुरी देण्यात यावी त्यामुळे औरंगाबाद ते चाळीसगाव 150 किमी अंतर कमी होईल.
– जालना-खामगाव 155 किमीच्या पुन्हा सर्वे करण्यात यावा. नीग्रो बीपी पूर्णा येथे रेल्वेच्या 150 एकर जागेवर रेल्वे प्रकल्प उभारण्यात यावा. त्यामुळे मराठवाड्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आपण एक विशेष रेल्वे औरंगाबाद ते सेवाग्राम पर्यंत सुरु करावी.

You might also like