Railway Employees | 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मिळणार वेतनवाढ; रेल्वे बोर्डाने केला आदेश जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway Employees | रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार 3 जून रोजी निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले कर्मचारीही यावर दावा करू शकतात. आणि त्यांना देखील थकबाकी मिळणार आहे. वेतनवाढी मळे कर्मचाऱ्यांना आता मूळ पेन्शन, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तसेच इतर भत्तेही वाढीव मूळ आधारावर मिळणार आहेत. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (वेतन आयोग) संदीप पाल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही 1 जुलै रोजी वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नव्हता | Railway Employees

रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या तारखेनुसार 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी तीन टक्के वार्षिक वेतनवाढीचा लाभ देते आतापर्यंत 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षभर काम करूनही 1 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळत नव्हता.

अशा स्थितीत न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधारे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देण्याचे आदेश मंडळाने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत. वेतनवाढ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव मूळ आधारावर पेन्शन, ग्रॅच्युइटी, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि इतर भत्तेही मिळतील.

निवृत्त कर्मचारी देखील दावा करू शकतात

रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, जे कर्मचारी आदेश जारी होण्याच्या तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. आदेशानुसार वेतनवाढ मिळाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी वाढीव मूळच्या आधारे मोजली जाईल आणि त्यांना मागील तीन वर्षांची थकबाकीही मिळेल.