Railway News : पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प; ‘या’ गाड्यांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway News : राज्यभरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्रीपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यातल्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून पुण्यातील सिंहगड रोड आणि नदीलगतच्या भागातील घरं आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्या (Railway News) पावसानं तोडला आहे.

तर दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे नद्यांना पूर आला आहे. तर बदलापूर जवळील उल्हास नदीला पूर आला आहे. शिवाय सखल भागातील रस्ते हे जलमय झाले असून त्यामुळे (Railway News) वाहतूक विस्कळीत झाले आहे.

मुंबई आणि पुण्यामध्ये होणाऱ्या पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवर झाला असून पुणे आणि मुंबई या मार्गावरून प्रवास (Railway News) करणाऱ्या गाड्या आज (२५) आणि उद्यासाठी (२६) रद्द करण्यात आले आहेत.

पुराची एकूणच परिस्थिती पाहता मध्य रेल्वे कडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज दिनांक 25 जुलै रोजी रद्द करण्यात आलया आहेत. तर उद्या सकाळी पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस, पुणे- मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे (Railway News) मुंबई ते पुणे आणि पुणे मुंबई अशा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.