Railway Recruitment 2024 | रेल्वे विभागात निघाली मेगाभरती, तब्बल 4608 रिक्त पदांची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway Recruitment 2024 | मित्रांनो तुम्हाला जर रेल्वेमध्ये काम करायचे असेल आणि ही नोकरी तुमची खूप दिवसापासूनची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आलेली आहे. कारण आता थेट केंद्र शासनाची नोकरी तुम्ही करू शकता. रेल्वे विभागात महाभरती चालू होणार आहे. त्यामुळे आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

रेल्वे विभागाकडून (Railway Recruitment 2024) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विविध पदांसाठी ही भरती निघत आहे. रेल्वेकडून ही भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदांसाठी राबवली जाणार आहे. तुम्ही अगदी कुठूनही या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आरआरबी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या भरतीबद्दलची सविस्तर माहिती समजेल त्यानुसार तुम्ही तिथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.

रेल्वेची ही अर्ज प्रक्रिया 15 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे 14 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच तुम्हाला अर्ज करण्यासाठी पूर्ण 1 महिना मिळत आहे. तुम्ही या तारखेपर्यंत रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकता. रेल्वेने या( Railway Recruitment 2024) भरतीसाठी तब्बल 4608 पदांची भरती काढलेली आहे.

या भरती प्रक्रियेत 4208 पदे ही कॉन्स्टेबल पदाची भरलेली जाणार आहे. तर उरलेली 452 पदे ही सब इन्स्पेक्टर या पदाची भरली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा तसेच शारीरिक चाचणी देखील द्यावी लागणार आहे. यामध्ये पास झाल्यानंतर त्यांची रेल्वे भरतीसाठी निवड होणार आहे.

त्यामुळे जर तुमचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक देखील रेल्वे भरतीची तयारी करत असेल, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचू शकता. जेणेकरून त्यांना देखील अर्ज भरण्यासाठी खूप फायदा होईल.