काय सांगता?? चक्क मशरुमपासून बनवलं सोनं; गोव्यातील शास्त्रज्ञांनी करून दाखवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आहाराबाबत प्रत्येकाची वेगवेगळी आवड असू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्याच घरात मशरूम खाल्ला जातो असे म्हणता येणार नाही. असे असले तरीही आज जे लोक मशरूम खातात आणि जे लोक मशरूम खात नाहीत तेसुद्धा ही बातमी अगदी उत्सुकतेने वाचतील. कारण, समोर आलेले वृत्त कुणालाही चकित करेल असेच आहे. आपल्या आहारातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा मशरूम हा सोने बनवण्यासाठी कामी येऊ शकतो, असा साधा विचारही कुणी केला नसेल. मात्र काही संशोधकांनी यावर अभ्यास करून चक्क मशरूमपासून सोन्याचे नॅनो कण तयार केले आहेत. चला तर संशोधकांच्या या शोधाविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेऊयात.

मशरूमपासून बनवले सोन्याचे कण

मशरूम पासून सोन्याचे नॅनो कण बनवता येतात, असा दावा गोव्यातील संशोधकांनी केला आहे. या दाव्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला मशरूम हा जंगली मशरूम असल्याचे म्हटले गेले आहे. बऱ्याच लोकांना मशरूम खायला आवडत नाही. मात्र ही बातमी मशरूम विषयी कुतुहल निर्माण करणारी नक्कीच आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, जंगली मशरूमपासून त्यांनी सोन्याचे नॅनो कण तयार करून दाखवले आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचताय. गोव्यातील शास्त्रज्ञांनी केवळ दावा केला नसून जंगली मशरूमपासून सोन्याचे नॅनो कण तयार करून दाखवले आहेत.

कुठे सापडले सोनं देणारे मशरूम?

एका वृत्तानुसार, सोन्याचे नॅनो कण ज्या मशरूमपासून बनवले गेले ते मशरूम दिमक टेकड्यांवर उगवतात. या मशरूमला गोव्यातील स्थानिक लोक ‘रॉन ओल्मी’ या नावाने ओळखतात. याच ‘रॉन ओल्मी’ प्रजातीतील मशरूमपासून शास्त्रज्ञांनी सोन्याचे कण तयार केल्याचे सांगितले जात आहे.

३ वर्षाच्या संशोधनानांतर यशप्राप्ती

जर्नल ऑफ जिओ मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, गेली ३ वर्ष वैज्ञानिकांची टीम या मशरूमच्या प्रजातीवर संशोधन करीत होती. या ३ वर्षात त्यांनी तयार केलेले रिपोर्ट त्यांना पुढील प्रगतीसाठी कामी आले. अखेर त्यांची मेहनत फळली आणि शास्त्रज्ञांनी ‘रॉन ओल्मी’ नामक मशरूमच्या प्रजातीपासून सोन्याचे नॅनो कण तयार करून दाखवले. त्यांनी हे संशोधन गोवा सरकारसमोर देखील मांडल्याचे समजत आहे.

गोव्याची आर्थिक स्थिती सुधारणार

‘रॉन ओल्मी’ या जंगली मशरूमपासून बनवलेल्या सोन्याच्या कणांमुळे गोव्याची आर्थिक स्थिती सुधारू शकते, असा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. त्यामुळे गोवा सरकार याबाबत विचार करेल अशी आशा आहे. अलीकडच्या काळात नॅनो पार्टिकल्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच या अजब संशोधनामुळे गोव्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून तंत्रज्ञानात आणखी प्रगती करता येईल आणि परिणामी गोव्याची आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सोन्याच्या नॅनो कणांचा वापर

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, ‘रॉन ओल्मी’ या जंगली मशरूम पासून बनवलेल्या सोन्याच्या कणांचा वापर हा बायोमेडिकल आणि बायोटेक्नॉलॉजिकल सायन्समध्ये करता येईल. हे सोन्याचे कण वैद्यकीय शास्त्रात औषध वितरण, वैद्यकीय इमेजिंग आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात वापरल्यास यामुळे मोठा बदल घडू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे

बाजारपेठेत मोठी मागणी

सोन्याच्या नॅनो कणांची जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यामुळेच या कणांचा बाजारभावदेखील मोठा आहे. एका वृत्तानुसार, फेब्रुवारी २०१६ मध्ये १ मिलीग्राम सोन्याच्या नॅनो पार्टिकलची किंमत अंदाजे ८० डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ८० हजार रुपये प्रति ग्राम इतकी होती. यावरून बाजारपेठेत या नॅनो पार्टिकल्सची जेवढी मागणी वाढेल तेवढी किंमत दिवसागणिक वाढत जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.