Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेकांना झालेला आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती 8113 पदांसाठी होणार आहे. आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झालेली आहे. रेल्वे भरती मंडळ(Railway Recruitment 2024) अंतर्गत ही भरती चालू झालेली आहे.13 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
भरती |Railway Recruitment 2024
रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी साठी ही भरती राबवली जात आहे.
रिक्त जागा
या भरती अंतर्गत तब्बल 8113 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेणे गरजेचे आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख
14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
13 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 18 ते 36 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क |Railway Recruitment 2024
या भरती अंतर्गत खुल्या गटातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी, महिला, माजी सैनिक उमेदवारांना 250 रुपये शुल्क असणार आहे.
रिक्त जागा
- मुख्य व्यवसायिक कम तिकीट पर्यवेक्षक – 1736 जागा
- स्टेशन मास्तर – 994 जागा
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 1507 जागा
- कनिष्ठ लेखक सहाय्यक सह टंकलेखक – 732 जागा