हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल बहुतेक तरुण हे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. अगदी शहरातील तसेच खेड्यापाड्यातील लोक देखील सरकारी नोकरीची तयारी करताना दिसतात. तुम्ही देखील अशाच एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. कारण भारतीय रेल्वेकडून एक बंपर भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये रेल्वेने (Railway Recruitment 2024) टेक्निशियनच्या एकूण 9144 पदांसाठी ही भरती प्रक्रिया काढलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर या भरती प्रक्रियेसाठी अजूनही अर्ज केला नसेल, तर लवकरात लवकर अर्ज करा. यासाठी तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आज म्हणजेच 9 एप्रिल 2024 आहे तुम्ही आज रात्री 11:59 पर्यंत हा अर्ज भरू शकता.
रिक्त जागांचा तपशील | Railway Recruitment 2024
या भरती अंतर्गत एकूण 9144 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये टेक्निशियन ग्रेड I सिग्नलच्या 1092 जागा टेक्निशियल ग्रेड III सिग्नलच्या 852 जागांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यता प्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून दहावी किंवा समक्ष पात्रता उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र दाखवावे लागेल. त्याचप्रमाणे आयटीआय झालेल्या विद्यार्थी देखील यामध्ये अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 36 वर्ष असणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे टेक्निशियन ग्रेड III सिग्नलच्या पदासाठी उमेदवाराशिवाय 18 ते 33 दरम्यान असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
भारतीय रेल्वेने जारी केलेल्या या जागांसाठी उमेदवारांना सीबीटी 1 आणि सीबीटी 2 परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होईल आणि त्यानंतर भरती होईल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल त्याचप्रमाणे राखीव प्रवर्ग महिला आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये भरावे लागेल.