Railway Tracks : रेल्वे रुळांमध्ये बारीक खडी का टाकली जाते? 99 टक्के लोकांना माहिती नसेल कारण

Railway Tracks
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Railway Tracks । मित्रानो, तुम्ही कधी ना कधी तरी रेल्वेने नक्कीच प्रवास केला असेल. आरामदायी प्रवास आणि तो सुद्धा कमी खर्चात असल्याने अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. भारतात रेल्वेचे जाळेही मोठे असून ती देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी दिमाखात धावते. परंतु तुम्ही रेल्वे प्रवास करताना एक गोष्ट तुम्हाला दिसली असेल ती म्हणजे रेल्वे रुळांमध्ये बारीक खडी पसरलेली असते…. हि खडी नक्की कशासाठी टाकली जाते हे तुम्हाला माहितेय का? किंवा समजा रेल्वेच्या रुळांमध्ये खडी टाकलीच नाही तर काय फरक पडू शकतो याचा तुम्हाला अंदाज आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो…..

रेल्वे रुळांमध्ये बारीक खडी टाकण्याचे कारण – Railway Tracks

हे दगड सामान्य नसतात , परंतु त्यांचा एक विशेष उद्देश आहे. त्यांना “बॅलास्ट” म्हणतात, आणि ते रेल्वे ट्रॅकच्या स्थिरतेसाठी, सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी आवश्यक असतात.

ट्रेनचे वजन खूप जास्त असते आणि जेव्हा ती पटरी वरून धावत असते तेव्हा रुळांवर प्रचंड दाब तयार होतो. अशावेळी हे बॅलास्ट दगड रुळांना घट्टपणे पकडून ठेवण्याचे काम करतात. हे दगड एकमेकांशी जोडले असल्याने एक मजबूत आधार तयार करतात, ज्यामुळे रुळ हलण्यापासून रोखले जाते. समजा हे दगड नसते तर ट्रेनच्या वजनाने रेल्वे रूळ हलले असते किंवा वाकडे तिकडे झाले असते.. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला असता.

ट्रेनचे वजन थेट रुळांवर (Railway Tracks) पडते आणि हे बॅलास्ट दगड वजन पसरवून जमिनीवर प्रसारित करतात. यामुळे रुळांवर असमान दाब पडू शकत नाही आणि ते बराच काळ टिकू शकतात. हे जे बॅलास्टदगडे नसती तर रेल्वे रुळ जमिनीत रुतले असते किंवा त्याचे तुकडे झाले असते.

आणखी एक गोष्ट म्हणजे, जेव्हा ट्रेन रुळावर (Railway Tracks) धावते तेव्हा तिच्या वेगामुळे आणि इंजिन मुळे कंपन होते, ज्यामुळे मोठा आवाज निर्माण होऊ शकतो. परंतु हि बारीक दगडे हे कंपन शोषण्याचे काम करतात आणि रेल्वेचा आवाज कमी करतात. समजा हे छोटे दगड रुळावर नसतील तर रेल्वेचा आवाज आणखी मोठा येईल.

रेल्वे रुळांमध्ये बारीक खडी टाकण्याचे आणखी एक कारण म्हणजे झाडे वाढवून न देणे.. होय जर रुळांमध्ये माती असेल तर तेथे झाडे वाढू शकतात, ज्यामुळे रुळ कमकुवत होऊ शकतात. अशावेळी बारीक खडी झाडांच्या वाढीला रोखण्याचे काम करतात. कारण त्यात पोषक तत्वे नसतात आणि वनस्पतींच्या मुळांना वाढू देत नाहीत.