नवी दिल्ली । तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करता तेव्हा रेल्वे आपल्याला फक्त 35 पैशांमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळवण्याचा पर्याय देते. या इन्शुरन्समुळे इन्शुरन्स कंपनी रेल्वे प्रवासातील नुकसान भरून काढते. यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर उपलब्ध आहे. यामध्ये अपघातातील वेगवेगळ्या पात्रतेनुसार प्रवाशाला इन्शुरन्सची रक्कम दिली जाते.
त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक कराल तेव्हा रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय नक्कीच निवडा. जेव्हा तुम्ही इन्शुरन्सचा पर्याय निवडता, तेव्हा तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवली जाईल. ही लिंक इन्शुरन्स कंपनीची आहे. या लिंकला भेट देऊन, तुम्ही तेथे नॉमिनी डिटेल्स भरणे आवश्यक आहे. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नॉमिनी असल्यासच इन्शुरन्स क्लेम उपलब्ध होतो.
अपघात झाल्यास ही रक्कम दिली जाईल
त्यामुळे रेल्वे अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात मदत होते. रेल्वे अपघातात तुम्हाला किती नुकसान झाले आहे, त्यानुसार तुम्हांला इन्शुरन्सची रक्कम मिळते. रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची इन्शुरन्सची रक्कम उपलब्ध आहे. रेल्वे प्रवासी अपघातात पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 10 लाख रुपये मिळतात. अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये, दुखापत झाल्यास 2 लाख रुपये रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या वाहतुकीसाठी इन्शुरन्स कंपनी 10 हजार रुपये देते.
अशा प्रकारे करा क्लेम
रेल्वे अपघात झाल्यास, ती व्यक्ती, नॉमिनी किंवा त्याचा वारसदार इन्शुरन्सचा क्लेम करू शकतात. यासाठी तो इन्शुरन्स कंपनीच्या जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन इन्शुरन्स क्लेम करू शकतो. आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जमा करावी लागतात. रेल्वे अपघातानंतर 4 महिन्यांच्या आत इन्शुरन्स क्लेम करता येतो.