हॅलो महाराष्ट ऑनलाईन Railway Waiting Ticket Rules। रेल्वेने सातत्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता तिकीट कन्फर्म होण्याची गॅरंटी वाढली आहे. रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने वेटिंग तिकिटांवर नवीन नियम लागू केला आहे. त्यानुसार, एकूण तिकीटांच्या केवळ २५ टक्के तिकीटांनाच वेंटीगसाठी ठेवले जाणार आहे. त्यामुळेच आपोआपच वेटिंगच्या लांबत्या यादीला ब्रेक लागणार आहे. तिकीटांना मर्यादीत वेटींग दिल्याने तिकीट कन्फर्म होण्याची संधी जास्त असण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वेटिंग तिकिटांच्या जास्त प्रमाणात वाट पाहण्यामुळे आरक्षित डब्यांमध्ये गर्दी वाढणे ही दीर्घकाळापासूनची समस्या आहे. या नवीन धोरणामुळे हि समस्याही सुटेल.
आतापर्यंत, वेटिंग लिस्ट मधील (Railway Waiting Ticket Rules) तिकिटांच्या मर्यादा जानेवारी २०१३ च्या परिपत्रकाद्वारे नियंत्रित केल्या जात होत्या. त्यात एसी फर्स्ट क्लासमध्ये ३०, एसी सेकंड क्लासमध्ये १००, एसी थर्ड क्लासमध्ये ३०० आणि स्लीपर क्लासमध्ये ४०० पर्यंत वेटिंग तिकिटे मिळू शकत होती. यामुळे अनेकदा प्रवाशांना अनिश्चित तिकिटांसह आरक्षित डब्यात चढावे लागत होते,, परिणांनी रेल्वेला मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत होता. आता मात्र भारतीय रेल्वे लवकरच २०१३ ची वेटिंग लिस्ट तिकिट मर्यादा रद्द करणार आहे आणि प्रत्येक कोचमधील एकूण बर्थ क्षमतेच्या २५% पर्यंत वेटिंग लिस्ट तिकिटांची मर्यादा ठेवणारा एकसमान नियम लागू करणार आहे.
उदाहरणार्थ, जर स्लीपर कोचमध्ये बुकिंगसाठी ४०० बर्थ उपलब्ध असतील, तर जास्तीत जास्त फक्त १०० तिकिटे वेटिंग यादीत (Railway Waiting Ticket Rules) दिली जातील.हा नियम स्लीपर, एसी ३-टियर, एसी २-टियर, एसी फर्स्ट क्लास आणि चेअर कार अशा सर्व वर्गांना लागू होतो. या धोरणात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विविध राखीव कोट्यांचा विचार केला गेला आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो, मेल/एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांसह सर्व श्रेणीतील ट्रेनसाठी हे नवीन नियम लागू असतील.
काय फायदा होणार? Railway Waiting Ticket Rules
सध्या वेटिंग तिकीट जादा जारी केले जात असल्याने कन्फर्म तिकीटांशिवाय अनेक वेटिंग तिकीट वालेही आरक्षित डब्यात घुसखोरी करतात. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. आणि मुळ आरक्षित प्रवाशांना अडचण होत असते. परंतु नव्या नियमानंतर या प्रकाराला आळा बसेल. बेकायदेशीर प्रवाशांची डब्यातील घुसखोरी कमी होईल. विशेषतः सण आणि सुट्टांच्या काळात स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यास अधिकाऱ्यांना देखील मदत होईल.