हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आरआरबी अंतर्गत 8 हजार टीटीईच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Railway Job) यासह स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्येही 3712 रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सविस्तर माहिती जाणून घेऊन त्वरित अर्ज भरावा. लक्षात ठेवा की, हा अर्ज 7 मेपर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर या पदासाठी जून- जुलै महिन्यात परीक्षा घेतली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, आरआरबी अंतर्गत तब्बल आठ हजार टीटीईच्या रिक्त पदांसाठी तरुणांची भरती करण्यात येणार आहे. तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत तीन हजारपेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे तरुणांनी वेळ न दवडता काम करू इच्छिणाऱ्या पदासाठी अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी www.indianrailways.gov.in च्या वेबसाईटला भेट द्यावी. महत्त्वाचे म्हणजे, या रिक्त पदांसाठी कोणत्या तारखेला परीक्षा घेण्यात येईल हे अजूनही सांगण्यात आलेले नाही.
वयोमर्यादा आणि पगार किती असेल?
तसेच, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तरुणांना रिक्त पदांसाठी अर्ज करता येईल अशी माहिती समोर आली आहे. परंतु या भरतीसाठी 18 वय वर्ष पूर्ण असलेले आणि 28 वयाच्या आतील उमेदवार अर्ज करू शकतात, असे सांगण्यात आले आहे. तर निवड झालेल्या उमेदवाराला 27 हजार 400 ते 45 हजार 600 रुपयेपर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी शारीरिक चाचणी आणि मेडिकल चाचणी घेण्यात येईल. या चाचणी पास झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांसाठी निवड केली जाईल.
अर्ज कोठे करायचा?
शिक्षक उमेदवाराला भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवाराकडून 500 रूपये आकारले जाईल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून तीनशे रुपये शुल्क आकारण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या रिक्त पदांसाठी 7 मे पर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांनी हा अर्ज ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरावा. अर्ज भरताना काळजीपूर्वक आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत.