हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्या देशामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु याच प्रवाशांना रेल्वे विभागाकडून (Railway Department) आखून दिलेले नियम माहित नसतात. त्यामुळे अनेकवेळा त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. हीच वेळ उद्या तुमच्यावर देखील येऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला रेल्वे विभागाने आखून दिलेले काही महत्त्वाचे नियम (Railway Traveling Rules) सांगणार आहोत. हे नियम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे आवश्यक आहे.
रेल्वेचे काही महत्त्वाचे नियम
रेल्वे विभागाने अशा काही वस्तूंची एक यादी तयार केली आहे ज्या वस्तूंना तुम्ही ट्रेनमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. परंतु, तरी देखील या वस्तू घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास केला तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकतात. त्यापूर्वी रेल्वेत कोणत्या वस्तू घेऊन जाणे टाळाव्यात हे एकदा वाचा. रेल्वेने प्रवास करताना कधीही ज्वलनशील पदार्थ, स्फोटक पदार्थ, दुर्गंधीयुक्त पदार्थ, गॅस सिलिंडर, सिगारेट, स्टोव्ह अशा वस्तू घेऊन जाऊ नयेत. तसेच रेल्वेमध्ये दारू पिण्यास मनाई आहे. रेल्वेने प्रवास करताना कोणतेही नशेचे पदार्थ सोबत ठेवू नयेत.
इतकेच नव्हे तर रेल्वेने प्रवास करताना, तुम्हाला काळजी घ्यावी लागते की आपल्या कोणत्याही कृतीमुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ नये. थोडक्यात सांगायचे झाले तर, मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे, कॉलवर मोठ्याने बोलल्यामुळे इतर प्रवाशांना त्रास झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. लक्षात ठेवा की, रेल्वे प्रवास करताना तुम्ही केलेली कोणतीही चुकीची कृती तुम्हाला महागात पडू शकतो.
रेल्वेने सामान किती घेऊन जाता येते?
महत्वाचे म्हणजे रेल्वेने प्रवास करताना एखाद्या व्यक्तीने सामान किती सोबत घ्यावे याबाबत ही नियम आहेत. या नियमानुसार भारतीय रेल्वेमध्ये 40 ते 70 किलो वजनाच्या सामानासह प्रवास करता येऊ शकतो. परंतु या सामानाव्यतिरिक्त अतिरिक्त सामान तुम्ही घेतले तर त्याचे पैसे द्यावे लागू शकतात. असे अनेक विविध नियम रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी आखून दिले आहे.