रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न! मजुरांकडून तिकिटाचे पैसे आकारलेच नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत घरी परतणाऱ्या श्रमिकांचा रेल्वे खर्च उलचलण्याची तयारी दाखवल्यानंतर रेल्वे मंत्रालयावर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढवली. भारतीय रेल्वे नाही मजुरांकडून नाही तर राज्य सरकारकडून पैसे वसूल करत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयानं केला. गरीब आणि असहाय्य मजुरांकडून आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकार तिकीट खर्च वसूल करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं मोदी सरकारवर टीका करण्यात आली. इतकंच नाही तर घरी परतणाऱ्या मजुरांचा रेल्वे तिकीटाचा खर्च काँग्रेसकडून करण्यात येईल, असं सोनिया गांधींनी जाहीर केलं. यांनतर रेल्वे मंत्रालयाने सरकारकडून तत्काळ प्रतिक्रिया देत रेल्वे थेट मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतच नसल्याचा दावा केला. शिवाय या तिकीटाचा खर्च राज्य सरकारकडून करत असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं.

दरम्यान, कमालीची बाब म्हणजे ‘श्रमिक रेल्वे’साठी रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार, या विशेष रेल्वेच्या तिकीटांची जेवढी मागणी राज्य सरकारकडून केली जाईल, तेवढीच तिकीटं छापण्यात येतील. राज्य सरकार ही तिकीटं प्रवाशांना सोपवतील आणि तिकीटाचे पैसे वसूल करून (collect ticket fare) ही रक्कम रेल्वेकडे सोपवतील, असं म्हटलं गेलं होतं. आता, मात्र रेल्वेनं घुमजाव करत रेल्वे थेट मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा दावा केला. ‘प्रवासी मजुरांना रेल्वे थेट तिकीट विक्री करत नाही. याची वसुली राज्य सरकारकडून केली जाते आणि तेही केवळ एकूण खर्चाच्या १५ टक्के असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. राज्यांच्या यादीनुसारच नागरिकांना प्रवासाची परवागी देण्यात येते असही रेल्वे म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment