यंदा ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पावसाचा ४४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; हवामान विभागाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील बऱ्याचं राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मोठमोठी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातल्या धरणातला पाणीसाठाही अधिक असल्याचं केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे. देशात सध्या सरासरीच्या ९ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

दरम्यान, यावर्षी ऑगस्ट महिन्यात २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. याआधी १९७६मध्ये देशात ऑगस्ट महिन्यात तब्बल २८.४ टक्के अधिक पाऊस झाला होता. सिक्कीम, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यात अधिक पाऊस झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेले दोन दिवसा चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरात चांगला पाऊस कोसळत आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. एकंदर राज्यात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment