हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rain Bath) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पावसाच्या सरी बरसू लागल्या की, मनाला होणारा आनंद काही औरच असतो. त्यामुळे बरेच लोक पावसात ओलेचिंब होईपर्यंत भिजतात. पावसाचे थेंब अंगावर झेलत मनसोक्त भिजायचा आनंद एक अनोखे सुख आहे. लहानपणी पावसात भिजल्यामुळे आजारी पडायला होईल, म्हणून कितीतरी वेळा आईने तुम्हाला अडवले असेल. मात्र, हाच पाऊस आज आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तज्ञ सांगतात की, पावसात भिजल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्याच फायदयांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
हार्मोन्सचे संतुलन (Rain Bath)
आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, पावसात भिजल्यामुळे हार्मोन्सचे योग्य संतुलन तयार होते. पावसाच्या नैसर्गिक थेंबांमूळे आपल्या शरीरातील एंडॉर्फिन आणि सेरोटोनिनसारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. परिणामी आपले हार्मोन्स संतुलित आणि मूड फ्रेश होतो. त्यात आपण जर जोडीदारासह पावसाचा आनंद लुटला तर नातेसबंध सुधारण्यास मदत होते.
ताण – तणाव दूर होतो
पावसात भिजल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन निर्माण होऊन हॅप्पी हार्मोन्स सक्रिय होतात. (Rain Bath) परिणामी आपल्या मनावर आणि मेंदूवरील ताण हलका होतो. ज्यामुळे आपले मानसिक स्वास्थ सुधारते.
त्वचाविकार जातील पळून
असं म्हणतात पावसात भिजल्यामुळे आजारपण येते. (Rain Bath) पण याच पावसात भिजल्याने शरीर नैसर्गिकरीत्या शुद्ध होते. पावसाचे पाणी थेट आभाळातून कोसळते जे नैसर्गिकरित्या शुद्ध मानले जाते. अशा पाण्याचा शरीरावर मारा झाल्याने त्वचा विकार दूर होण्यास साहाय्य मिळते.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल दूर
पावसाच्या नैसर्गिक थेंबांमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 तयार होण्यास मदत होते. (Rain Bath) जोरदार पावसात साधारण १० ते १५ मिनिटे चिंब भिजल्यास शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर होऊ शकते.