यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट; बाजारपेठा सामानाने फुल्ल पण लोकांविना शांतच..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | यंदा पावसाने राज्यभरात कहर माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने आतापर्यंतचं सर्वाधिक रौद्ररूप दाखवलं असून याचा परिणाम दिवाळी सणावरही होईल असं दिसून येत आहे. मागील ५ दिवसांपासून पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर या ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. घराबाहेर पडण्यासाठी पाऊस जराही उसंत देत नसल्याने याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम दिसून येत आहे. या आठवड्याच्या शेवटी वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला सुरुवात होणार असून, या सणावरही पावसाचे सावट जाणवून येत आहे.

बाजारपेठेतील दुकाने दिवाळीच्या सामानांनी भरून गेली असली तरी पावसामुळे पुणेकर नागरिक घरातच अडकल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कपडे, फटाके, सौंदर्य प्रसाधने, आकाशदिवे, रांगोळी, दिवाळी फराळ बनविण्यासाठीचं साहित्य घेण्यासाठी दरवर्षी पुण्यातील तुळशीबाग, लक्ष्मी रोड, शुक्रवार पेठ, चिंचवड, वारजे, वडगाव शेरी परिसरातील बाजारपेठा लोकांनी भरून गेलेल्या असतात. यंदा मात्र त्या गर्दीमध्ये घट झाल्याचं दिसून येत आहे. राज्यातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारचं वातावरण असून येत्या २ दिवसांत पाऊस उघडीप घेईल अशी आशा लोक व्यक्त करत आहेत.

Leave a Comment