गुरुवारपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेमोसमी पाऊस होत आहे. काही भागांत गारपीट व विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे. त्यामुळे साधारण गुरुवारपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच राजस्थानचा नैऋत्य भाग ते अरबी समुद्राचा ईशान्य भाग, सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे.

राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघर्गजनेसह अवकाळी पाऊस होईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment