मराठवाड्यात पावसाचा हाहाकार ! नदी- नाल्यांना पूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील 24 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, पूल कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण 95 टक्के भरले असून, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील सकाळपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

औरंगाबादेत गौताळा घाटात कोसळली दरड –
प्रसिद्ध वन्य जीव अभयारण्य असलेल्या गौताळा अभयारण्याच्या घाटात दरड कोसळल्याने कन्नड- नागद हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे. तसेच जिल्ह्यातील खेळणा धरण ओव्हरफ्लो झाले असून इतरही अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

बीडमध्ये महापूर –
बीड जिल्ह्यातही पावसाचा कहर कायम असून बिंदुसरा धारण फुल भरले आहे, तर माजलगाव धरणातून एक लाख क्युसेकने पाणी सोडण्यात आहे. तसेच मुसळधार पावसाने जिल्ह्यातील परळी- अंबेजोगाई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेवराई तालुक्यातील 20 ते 25 गावांचा अतिवृष्टी मुले संपर्क तुटला आहे.

परभणीला पावसाने झोडपले, येलदरी धरण फुल –
मराठवाड्यात पावसाचा सर्वाधिक फटका परभणी जिल्ह्याला बसला आहे. जिल्हातील तसेच मराठवाड्यातील महत्वाचे असलेले येलदरी धरण 95 टक्के भरल्याने शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सेलू तालुक्यातील दुधना प्रकल्प भरल्याने सेलू तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची तहसीलदारांनी पाहणी केली आहे.

लातुरात पावसाची जोरदार हजेरी –
जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून पावसाचा सर्वाधिक फटका अहमदपूर तालुक्याला बसला आहे. अहमदपूर तालुक्यात सर्वदूर आज सकाळपासून जोरदार पाऊस होत असून, खानापूर जवळील पुलावरून पाणी वाहत आहे. तालुक्यात मागील चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने खंडाळी, अंधोरी, किनगाव, उजना, रोकडा सावरगाव, परचंडा परीसरातील नदीनाले एक झाले आहेत. खानापूर येथील काही घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनगाव- लातूर रोड पॆसामुळे बंद झाला आहे.

जालन्यात पावसाचा धुमाकूळ, सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो –
जिल्यातही पावसाचा जोर कायम असून अंबड तालुक्यात पावसाने दोन ते दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील सिंचन प्रकल्प पाण्याने ओव्हरफ्लो झाले आहेत. शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकांत पाण्याचे पाट साचले आहे. यामुळे खरिपाची पिके आता हातची गेल्यातच जमा आहे. तसेच घनसावंगी तालुक्यात देखील पावसाचा जोर कायम असून बहुतांश पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच भोकरदनचे धारणा धारण ओव्हरफ्लो झाले आहे.

हिंगोलीतील औंढा तलाव ओव्हरफ्लो –
जिल्ह्यातील औंढा शहर व तालुक्यात सोमवारी दिवसभर व रात्री झालेल्या जोरदार पावसाने औंढा येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावातील पाणी ओसंडून वाहत होते. याचा लाभ शहरातील पाणी पुरवठ्यासाठी होणार असल्याने नागरिक समाधानी झाले आहेत. औंढा शहर व परिसरात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी, नाले, ओढे,बंधारे तुडुंब भरले आहेत. सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने शहरातलगत असलेला औंढा तलाव शंभर टक्के भरला असून तो ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावातून पाणी ओसंडून वाहत आहे.

नांदेडातील विष्णूपुरीचे 10 दरवाजे उघडले –
नांदेड जिल्ह्यातही सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून, अनेक भागात नदीकाठची पिके वाहून गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील 11 मंडळात अतिवृष्टी झाली असून, पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील इसापूर धारण 90 टक्के भरले आहे, तर विष्णुपूरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात मांजरा नदीला पूर –
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तसेच इट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने वाशी तालुक्यातील पारगाव परिसरात बहुतांश शेतात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील मांजरा नदीला पूर आले असून, पाणी लगतच्या शेतात घुसले आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वर प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. भूम तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले आहे.

 

Leave a Comment