मुंबईत पावसाचा हाहाकार : चेंबूरमध्ये भूस्खलन होवून घरांवर भिंत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी मुंबई पावसाच्या पाण्याने तुंबलेली पहायला मिळत असून लोक अडकल्याचेही चित्र दिसत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात भूस्खलन झाल्याने घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली अद्याप 7 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. यामुळे त्या परिसरातील चार ते पाच परिसरात घरांवर भिंत कोसळली आहे. यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अद्याप 6 ते 8 जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

विक्रोळीच्या पंचशीलनगर विभागातही 3 ते 4 घरे कोसळल्याची घटना समोर येत असून तेथेही काही लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. विरारमध्येही पाऊस जोरदार झाला आहे. बोरीवलीत 5 ते 6 तास जोरदा पाऊस सुरू आहे. यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप आलेलं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गाड्या पाण्यात गेलेल्या आहेत.

Leave a Comment