हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raireshwar Fort) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले पाहायला मिळतात. प्रत्येक किल्ल्याचे काही ना काही वैशिट्य काही ना काही खासियत आहे. असेच अत्यंत असामान्य वैशिट्य असलेल्या रायरेश्वर किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या रायरेश्वर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्याच पावन किल्ल्यावरील टेकडीवर एकाच ठिकाणी ७ वेगवेगळ्या रंगांची माती आढळते. होय. हे आश्चर्यकारक असले तरीही सत्य आहे. चला याविषयी जाणून घेऊ.
रायरेश्वर किल्ला (Raireshwar Fort)
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात स्थित असलेला रायरेश्वर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. अशा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला हा किल्ला इतिहासाबरोबरच त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. या किल्ल्यावर एक दोन नव्हे तर चक्क ७ वेगवेगळ्या रंगांची माती एकाच ठिकाणी आढळते. त्यामुळे हा किल्ला खऱ्या अर्थाने वेगळा सिद्ध होतो. अनेक वैज्ञानिकांनी या मातीचा अभ्यास करून विविध निष्कर्ष लावले आहेत.
रायरेश्वराच्या टेकडीवर नैसर्गिक खजान्याचे दर्शन
रायरेश्वर किल्ल्यावर जाताना लागणारी वाट अतिशय दुर्गम आहे. त्यामुळे शिड्यांचा आधार घेतल्याशिवाय हा गड सर करणे कठीण आहे. गडावर चिंचोळी वाट चढून आल्यावर रायरेश्वराचं भव्य पठार दिसत. शेकडो एकरावर पसरलेल्या या पठाराच्या मध्यभागी रायरेश्वराचं पुरातन मंदिर आहे आणि याच मंदिरात महादेवाला साक्षी मानून छत्रपतींनी स्वराज्याचा संकल्प सोडला व तो सिद्धीस नेल्याची ऐतिहासिक घटना घडली होती. (Raireshwar Fort) अशा या पुरातन आणि ऐतिहासिक मंदिराच्या पाठी सुमारे १ किलोमीटर अंतरावर एक टेकडी आहे जिथे निसर्गाचा अद्भुत खजाना पाहायला मिळतो. या एकाच ठिकाणी ७ वेगवेगळ्या रंगाची माती पहायला मिळते.
सप्तरंगी मातीचे प्रकार
रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिरामागे असणाऱ्या टेकडीवर विविध रंगाची माती पहायला मिळते. इथे काही माहिती जांभळी तर खालच्या बाजूस पाहिले असता काही माती पिवळ्या रंगाची दिसून येते. (Raireshwar Fort) तसेच थोडे वरच्या बाजूला पाहिले तर इथली माती लाल आणि पलिकडे गुलाबी माती दिसून येते. याशिवाय कड्याच्या खालील बाजूला मातीचा रंग करडा होत गेल्याचे दिसते. तर काही भागात काळी आणि पांढरी माती देखील पहायला मिळते. अशाप्रकारे येते जवळपास ७ रंगाच्या विविध मातीचे प्रकार पहायला मिळतात.
संशोधक काय म्हणाले?
रायरेश्वरावर सापडलेल्या या ७ रंगाची माती पाहिल्यानंतर अनेक संशोधकांनी या मातींचा अभ्यास केला. त्यानुसार काहींनी म्हटले, कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीत काळ्या पाषाणाची निर्मिती झाली होती. पुढे या पाषाणावर निसर्गातील इतर घटकाचा परिणाम होऊन वेगवेळ्या रंगांचे दगड तयार झाले आणि त्या दगडांपासून अशी वेगवेगळ्या रंगाची माती तयार झाली असावी. (Raireshwar Fort) मातीचे वेगवेगळ्या रंगांचे थर इथे कायम दिसून येतात. अशा एकाच ठिकाणी मातीच्या इतका छटा दुर्मिळ असल्याने पर्यटक इथे कायम येत असतात.