फ्रान्समध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्याला बलात्कार मानले जाणार

पॅरिस । फ्रान्स लैंगिक संबंधासंदर्भात प्रथमच कायद्यात मोठा बदल होणार आहे. फ्रान्समध्ये 15 वर्षाखालील मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा ठरेल. कायद्यात बदल झाल्यानंतर आता मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शिक्षा देणे सोपे होईल. फ्रान्समध्ये मुलींवरील वाढत्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर लोकांकडून दबाव निर्माण झाला आणि यामुळे सरकारला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले.

दुसरीकडे मुलांच्या हक्क कार्यकर्त्यांनी आणि पीडितांनानी या घोषणेचे स्वागत केले आहे. लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी समाज म्हणून आणखी काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. फ्रान्समध्ये लैंगिकतेसाठी किमान वय नाही, ज्याचा फायदा गुन्हेगार वापरत असत. यामुळेच दोषींना कायदेशीर शिक्षा देणे देखील अवघड होत होते.

फ्रान्सच्या न्याय मंत्रालयाने असे म्हटले आहे की, असे गुन्हे मुलांवरील असे अपराध असह्य आहेत आणि हे बदल लवकरात लवकर राबविण्यास सरकार कटिबद्ध आहे. न्यायमंत्री एरिक डुपोंड म्हणाले की,”15 वर्षाखालील मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे यापुढे बलात्कार मानले जाईल.” या घोषणेनंतर असे मानले जाते आहे की, या बदलांमुळे फ्रान्समधील गुन्हेगारांना एक कठोर संदेश दिला गेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like