आर्यन खान योद्धाचा मुलगा, तो नक्कीच लढेल; राज बब्बरचा आर्यनला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई क्रूझ पार्टीमधील ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या शाहरुख खान चा मुलगा आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली असून शाहरूख खानसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र बॉलीवूड कलाकारांनी आत्तापर्यंत शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दर्शवला आहे. आर्यन हा योध्दाचा मुलगा असून तो नक्कीच लढेल अस ट्विट दिग्गज अभिनेते राज बब्बर यांनी केलं आहे.

राज बब्बर म्हणाले, तो आला लढला आणि त्याने विजय मिळवला. शाहरुखला बऱ्याच काळापासून ओळखत आहे, त्याच्या आत्म्याला या कठीण काळात थोडाही धक्का बसणार नाही. जसे जग त्याच्या लहान मुलाला त्या जखमांद्वारे शिकवते, मला खात्री आहे की योद्धाचा मुलगा नक्कीच परत लढेल. आशीर्वाद,” अशा आशयाचे ट्वीट राज यांनी केले आहे.

दरम्यान, आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खान आणि गौरी खानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण पूजा भट्ट, सुझान खान, मिका सिंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि हंसल मेहता, हृतिक रोशन आणि शेखर सुमन सारख्या अनेक मोठ्या स्टार्सनी या कठीण काळात शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे.

You might also like