शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक; अश्लील फिल्म निर्मितीप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून काही मोबाइल अॅपवर या फिल्म प्रदर्शित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राज कुंद्रा यांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक पत्रक जारी करत दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आले असता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर सोमवारी अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, राज कुंद्रा यांना यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मार्च २०२० मध्ये राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईत राहणारे NRI सचिन जोशी यांनी ही तक्रार दाखल केली होती. सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

Leave a Comment