राज कुंद्रांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; होणार सखोल चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून काही मोबाइल अॅपवर या फिल्म प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी राज कुंद्रा यांचा पाय आणखी खोलात गेला असून राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणामध्ये राज कुंद्रा मुख्य आरोपी आहे. राज कुंद्राच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याच आधारावर पोलिसांनी आज सकाळी रायन थार्प या व्यक्तीला अटक केली आहे. रायन थार्प देखील राज कुंद्राशी थेट संबंधित असून पॉर्न फिल्म निर्मितीमध्ये त्याचाही सहभाग असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.

 

काय आहे प्रकरण –

काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले

Leave a Comment