अतिरेकी सापडलेल्या मुंब्र्यातून आव्हाड निवडून येतात; राज ठाकरेंनी यादीच वाचली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्या भागात अतिरेकी सापडले त्या मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात असे म्हणत राज ठाकरे यांनी मुंब्र्यातून आत्तापर्यंत मुसक्या आवळलेल्या अतिरेक्याची यादीच भर सभेत जनतेला वाचून दाखवली.

राज ठाकरे म्हणाले , २४ ऑगस्ट २००१ सीमीच्या ६ हस्तकांना मुंब्र्यातून अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्च २०२० हिजबुल मुजाहिद्दीनच्या ४ अतिरेक्यांना मुंब्र्यातून अटक करण्यात आली. २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक, अशी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईची यादीच देत अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर देखील घणाघाती टीका केली. शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात असं अस म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढला असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.

Leave a Comment