उद्या ईद आहे त्यामुळे कुठेही महा आरत्या करू नका; राज ठाकरे यांचा ट्विटद्वारे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येतील सभेत भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी घेतलेल्या बैठकीवेळी त्यांनी दिलेल्या आदेशानंतर मनसेकडून पुण्यात 3 मे रोजी महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. मात्र, आज राज ठाकरेंनी एक ट्विट केले असून “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका,” असा आदेश ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी नुकतेच त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र सैनिकांसाठी…उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका.

 

आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन”, अशी सूचना राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे.

कालच्या सभेत काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यातील महत्वाचा मुद्दा असलेल्या मशिदींवर असलेल्या भोंग्याबाबतही त्यांनी आपली भूमिका मंडळी. ते म्हणाले की, “आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही. तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावावी, नीट ऐकले नाही तर वाजवाची, असे राज ठाकरे यांनी म्हंटले होते.

Leave a Comment