Saturday, June 3, 2023

राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; शस्त्रक्रिया पुढे ढकलली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पायाचे दुखणे वाढल्यामुळे ते काल शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले. मात्र, शस्त्रक्रियेपूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांच्या शरीरात कोरोनाच्या मृत पेशी आढळल्या. त्यामुळे त्याची होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरीरात कोरोनाच्या मृत पेशी आढळल्यामुळे राज ठाकरे यांना पुन्हा दुसऱ्यांदा कॉरोनची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय भूल देणे शक्य नसल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच त्यांची शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी 24 तास आधी राज ठाकरे यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. मात्र, चाचण्यांमध्ये कोरोनाच्या मृत पेशी आढळल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचीही उपस्थिती होती.