Saturday, March 25, 2023

राज ठाकरेंचा CAA ला पाठींबा; CAA, NRC समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशभरात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे येणाऱ्या 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात दिली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठींबा द्यायला तयार आहोत, असे म्हणत राज ठाकरे यांनी मोदी सरकारला पाठींबा दिला.

 

- Advertisement -

मनसेच्या महाअधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण झाले. या भाषणात राज ठाकरे यांनी पक्षाची बदलती भूमिका स्पष्ट केली. तसेच बदललेल्या झेंड्यावरही सविस्तर भाष्य केले. त्यांनी म्हंटले की, २००६ साली पक्ष स्थापन झाला त्यावेळी माझ्या मनातील झेंडा हा झेंडा होता. सोशल इंजिअरिंग म्हणजे सर्वांना सोबत घेऊन पुढे सर्वाना बरोबर घेऊनच तर शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवजयंतीच्या किंवा गुढी पाडव्याला हा झेंडा लाँच करण्याचा विचार होता. गेल्या वर्षभरापासून हा झेंडा आणण्याचा विचार होता. आपला डीएनए हाच आहे. या झेंड्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे झेंडा जपून वापरण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच हा झेंडा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.