‘मी झेंड्याचा रंग बदलला, रंग बदलून सरकारमध्ये गेलो नाही!’; राज ठाकरेंनी लगावला शिवसेनेला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । राज ठाकरे यांनी आज मनसेच्या महाधिवेशनाची सुरुवात मराठी बांधवानो अशी न करता माझ्या तमाम हिंदू बंधुनो अशी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना झेंडा आवडला का असा प्रथम सवाल केला. कार्यकत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताच राज ठाकरे यांनी अधिवेशनाला झेंड्याचा रंग बदलला म्हणून मी रंग बदलणार नाही. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसल्याचा टोला शिवसेनेला लगावला.

महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे हजर राहिले होते. मात्र आत्तापर्यंत त्यांनी या सगळ्या प्रयोगाबाबत काहीही भाष्य केलं नव्हतं. आजही त्यांनी याबाबत काही बोलणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. मात्र आपल्या भाषणात त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला

यशाला बाप खूप असतात पण पराभव झाला की सल्लागार खूप मिळतात असं सांगत राज ठाकरे यांनी पुढील वाटचाल ही शिस्तबद्ध पद्धतीनेच होणार याकडे लक्ष वेधलं. बारामतीकर पाठक आणि वसंत फडके यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी दिली असून तेच सगळी जबाबदारी सांभाळतील असं ठाकरे यावेळी म्हणाले. शॅडो कॅबिनेटविषयी बोलताना समाजावर परिणाम करणारी विद्यमान सरकारची खाती नीट काम करतात की नाही याकडे लक्ष दिलं जाईल अशी स्पष्टोक्ती राज ठाकरे यांनी दिली.

पाकिस्तान आणि बांगलादेशमधील घुसखोरांना हाकलण्यासाठी केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा विचार असल्याचं राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोलाची आणि महत्वपूर्ण माहिती माझ्याकडे आली असून देशाच्या गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं सांगत येत्या ९ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेशमधील घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरे आपल्या भाषणाच्या समारोपात म्हणाले.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

राज ठाकरेंचा CAA,NRC ला पाठींबा; CAA, NRC समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा

मनसेनं झेंडा का बदलला? राज ठाकरेंनी दिलं हे उत्तर

मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे

Leave a Comment