हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला दिल्यानंतर त्यांच्या सल्याला राज ठाकरे प्रत्युत्तर दिले आहे. “मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावे, असे ठाकरेंनी म्हंटले आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “हजारो वर्षांपासून आपल्याकडे जात ही गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यन्तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचे राजकारण वाढले असल्याचा ठाकरेंनी आरोपही केला होता. त्यानंतर पवारांनी त्यांना खोचक सल्ला दिला होता. याचा आज राज ठाकरे यांनी समाचार घेतला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.