राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया, चाचण्यांसाठी आज रुग्णालयात दाखल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या रविवारी (19 जून) रोजी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी राज ठाकरे आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय डॉक्ट्ररांनी घेतला होता. दरम्यान आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असून आज दुपारी त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या केल्या जातील. त्यानंतर त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया केली जाईल, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले होते. पण तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

Leave a Comment