राज ठाकरेंचा मनसे हा डाऊन झालेला पक्ष : रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मनसेचे सभाचं वादळं सुरू आहे. मनसेच्या सभेला गर्दी होत असली, तरी मते मात्र मिळत नाहीत. सुरुवातीला निवडणुकीत 13 जागा मिळवणारा मनसे पक्ष आता डाऊन झाला आहेत. आता जरी मनसेने हिंदुत्ववादी मुद्दा घेतला असला, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मनसेची एक जागा निवडून आलेली आहे. ती जागाही उमेदवारांच्या बळावर निवडूण आलेली आहे, राज ठाकरेंमुळे ते निवडूण आले नाहीत.” असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर टीकेची झोड उठवली आहे. मनसेला मत मिळत नाहीत, त्याचं भाषणाचं वादळं आहे, मात्र मताचं वादळ येवू शकत नाही, असेही मत त्यांनी मांडले.

रामदारा आठवले म्हणाले, भाजपा आणि मनसे सोबत येणार नाही, कारण ते भाजपाला राष्ट्रीय पातळीवर परवडणारे नाही. भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आर.पी.आय. बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज,” असा सवाल उपस्थित केला.

Leave a Comment