राज ठाकरेंची औरंगाबादेतील सभा उधळून लावण्याचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ‘मशिदीवरील भोंगा हटाव’ मोहीम हाती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी शहरात सभा होणार आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापत असून राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे. प्रशासनाने परवानगी दिली तरी आम्ही सभा उधळून लावू, असा इशाराही कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं की, ‘सध्या सर्व जाती-धर्माचे सण-उत्सव शांतता व सद्भावना कायम ठेवून साजरे केले आहेत, अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असा आरोप कांबळे यांनी केला आहे.

त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

Leave a Comment