हाथरस प्रकरणावरून राज ठाकरे संतापले ; केंद्र सरकारला केलं ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवरून देशभर निषेध केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी यावरून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केलं असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे.

‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे सारंच मन विषण्ण करणारं आहे, पण त्याहून भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणं हा आहे’, अशा शब्दांत राज यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचे हे होऊन चालणार नाही. ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे’, असे परखड मतही राज यांनी नोंदवले.

तेव्हा ओरडणारे आता गप्प का ??
महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना जाब का विचारला जात नाहीये?’, असा सवालही राज यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment