राज ठाकरे यांची मेळखाटातील अतीदुर्गम भागाला भेट

0
67
Raj Thakre
Raj Thakre
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चिखलदरा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मेळघाटच्या अतीदुर्गम भागातील चिलाटी या गावाला भेट दिली. दसऱ्याला रेल्वेने प्रवास करुन चिखलदऱ्यात दाखल झालेल्या राज यांनी आज आदिवासी बांधवांशी संवाद साधला. तसेच “मेळघाट मित्र’ या संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.

सेमाडोह, कोलकासच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत राज थेट दुर्गम भागातील चिलाटी गावात पोहोचले. मेळघाट मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांशी तसेच आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील समस्या जाणून घेतल्या.

मेळघाट मित्र ही संस्था ज्या गावात शिक्षक नसेल किंवा काही शैक्षणिक अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करते. आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य सुद्धा या संस्थेने केले आहे, त्यामुळेच राज ठाकरे यांनी या संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here