कल्याण | १ ऑगस्ट पासून मल्टी फ्लेक्स थेटरने खाद्य पदार्थाचे दर कमी करण्याची घोषणा विधानसभेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. परंतु १ तारखे पासून दर जसेच्या तसेच असल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कल्याण मध्ये एका मल्टी फ्लेक्स थेटरला लक्ष केले. या थेटरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसून खिडकीच्या काचा खाद्य पदार्थांचे काऊंटर फोडले असून मल्टी फ्लेक्सचे दर कमी केले नाही तर हे आंदोलन राज्य भर केले जाईल असे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात मनसेने हा विषय उचलून धरला होता. पुणे, मुंबई, नागपूर या राज्यातील प्रमुख शहरात मनसेने आंदोलन केले होते. हा मुद्दा विधान सभेत दाखल झाल्यावर शहरी आमदारांनी या विषयावर वादळी चर्चा केल्या नंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मल्टी फ्लेक्स थेटरला दर कमी करण्यासाठी आदेश देण्यात आले होते. तर आम्हाला आशा प्रकारचा कोणताच जी आर आला नाही असा दावा थेटर मालकांनी केला आहे. या विषयात सरकारने विधान सभेत घोषणा केल्याने विषयाचे गांभीर्य अधिक आहे त्यामुळे या विषयात सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.