राजाभाऊ जायंट किलर ठरले; नाशिकमध्ये डाव नेमका कुठं फिरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साधा सदरा गळ्यात मफलर… विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा भोळा मराठा चेहरा आपल्या फरडया इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो. होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल… वाजेंनी मशालीच्या चिन्हावर नाशिक लोकसभेचा गुलाल उधळला… शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि इतर बड्या नेत्यांना डावलून उद्धव ठाकरेंनी खासदारकीसाठी एका सर्वसामान्य मराठा नेतृत्वावर विश्वास टाकला. वाजेंच्या विरोधात आपण सहज निवडून येऊ असा काहीसा एटीट्यूड पहिल्या दिवसापासून महायुतीत पाहायला मिळाला. पण आता याच वाजेंनी जिल्ह्यात अशी काय फील्डिंग लावली की, हेमंत गोडसेंच्या नाकावर टिच्चून राजाभाऊ मशाल पेटवणारच! इतका कॉन्फिडन्स त्यांनी ठाकरेंना दिला… आणि दिलेल्या शब्दावर पक्कं उतरत हा साधासुधा माणूस आता खासदार झालाय…नाशिक सारख्या बालेकिल्ल्यातून अनेक पर्याय असतानाही राजाभाऊच योग्य पर्याय ठाकरे यांना का वाटले?

राजाभाऊ वाजे यांना दोन महिने अगोदर मिळालेली उमेदवारी

लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांना दोन महिने अगोदर तिकीट मिळाल्याने त्यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढून होता. प्रचारात वाजे हे हेमंत गोडसेंपेक्षा आघाडीवर होते. महायुतीचं ठरत नव्हतं तोपर्यंत राजाभाऊ वाजेंनी प्रचाराचा दणका उडवून दिला होता. आता तोच त्यांना गुलालाचा मानकरी बनवण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे…

Rajabhau Waje जायंट किलर ठरले, Nashik Lok Sabha जिंकली | Maharashtra Lok Sabha Election Result

आता दुसरा मुद्दा येतो तो शांतिगिरी महाराजांची उमेदवारी

अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे युतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी अडचणी वाढल्या होत्या. हिंदू मतांमध्ये झालेली विभाजन याचा जोरदार फटका हेमंत गोडसेंना बसलाय… ग्रामीण पट्टयात मोठ्या प्रमाणात शांतिगिरी महाराजांचा प्रभाव राहिला. त्या भागातील सर्व मतं महाराजांना मिळताना दिसली तर हेमंत गोडसेंना ग्रामीण भागातून झालेले कमी मतदान हे देखील वाजे यांच्या पथ्यावर पडलं…

तिसरा महत्त्वाचा मुद्दा राहिला तो शहरातील घटलेले मतदान

शहरात घटलेले मतदान व ग्रामीण भागातील वाढलेले मतदान याचा फटका यावेळी हेमंत गोडसेना बसला. प्रामुख्याने शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीचेच आमदार होते या आमदारांनी हेमंत गोडसे यांचे काम केलेले दिसलं नाही तर शहरातील भाजपच्या मतदारांनी हेमंत गोडसे यांना टांग दिली. याउलट ग्रामीण भागात राजाभाऊ वाजे यांच्या मशालीची सुप्त लाट होती. त्यात ठाकरेंचा इमोशनल फॅक्टर चालल्यामुळे वाजे आरामात निवडून आले…

आता पाहू शेवटचा मुद्दा तो म्हणजे गोडसेंच्या झालेल्या उमेदवारीला विलंब

सुरुवातीपासून भाजपचा गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता… त्यात छगन भुजबळ फॅक्टरचा गोडसेंना मोठा तोटा झाला.. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. अजित पवारांची राष्ट्रवादी सायलेंट मध्ये राहणं, भाजपचा असणारा अंतर्गत अंतर्गत विरोध आणि या सगळ्यात मागच्या काही दिवसात वाजेंनी बनवलेली सेल्फ इमेज या सगळ्याचा परिणाम म्हणून आता नाशिकमधून एक साधा शिवसैनिक खासदार झालाय…